Maharashtra News: बीपीसीएलतर्फे २५० एमटी प्लॅस्टिक कचऱ्याच्या वापरातून २७,००० एसक्यूएम रस्त्याची उभारणी

0
23

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२२ – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या महारत्न, फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनी आणि तेल विपणन कंपनीने आज २५० एमटी प्लॅस्टिक कचऱ्याचे २७,००० एसक्यूएम रस्ता बनवण्यासाठी रिसायकलिंग करण्यात आल्याची घोषणा केली. त्यासाठी कंपनीच्या कॉर्पोरेट रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरने (सीआरडीसी) विकसित केलेली वेस्ट प्लॅस्टिक रोड (डब्ल्यूपीआर) प्रक्रियेचा वापर करण्यात आला. हा उपक्रम पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी करण्याच्या प्रयत्नांतील तसेच अन्न साखळीमध्ये त्याचा समावेश होण्यापासून रोखण्याच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-news-डॉ-कांताताई-नलावडे-साह/

त्याशिवाय हा उपक्रम कंपनीला त्यांचे उर्त्सनाचे नेट झिरो ध्येय पूर्ण करण्यास आणि स्वच्छ भारत मिशन यशस्वी करण्यात मोठी मदत करेल.

हा उपक्रम देशभरातील पायाभूत सुविधा निर्माणात विस्तारल्यास प्लॅस्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनाची समस्या निवारण्यास मदत होईल, शिवाय जीएचजी उत्सर्जन कमी होऊन चक्राकार अर्थव्यवस्थेस चालना मिळेल. हा उपक्रम पुढे नेण्यासाठी बीपीसीएलने नुकतेच मुंबई, महाराष्ट्रातील पाटण साई येथील आपल्या नव्या फ्युएल स्टेशनवरील रस्ता निर्मितीसाठी डब्ल्यूपीआर प्रक्रियेचा वापर केला असून भविष्यात त्याचा इतर ठिकाणीही वापर केला जाणार आहे.

साइटवरील परिस्थितीनुसार अंदाजे ५०,००० किलो प्लॅस्टिक कचरा/किमी ६ मीटर रूंदीच्या रस्त्यासाठी वापरला जातो. डब्ल्यूपीआर प्रक्रियेच्या मदतीने बीपीसीएलने सहा राज्यांतील २७,०३२ एसक्यूएम जागा व्यापणाऱ्या रस्त्यांसाठी २५० एमटी मिश्र प्लॅस्टिक कचरा वापरला. सीपीसीबीने उत्पादनांच्या प्लॅस्टिक पॅकेजिंगच्या जीवन चक्राचे विश्लेषण केले असून त्यानुसार १ एमटी प्लॅस्टिक कचरा पुनर्निमितीसाठी वापरला गेल्यास अंदाजे ३ एमटी जीएचजी उत्सर्जन कमी होते.

या प्रक्रियेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी प्लॅस्टिक कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची गरज नसते. यामुळे मनुष्यबळ लागत नाही तसेच मानवी हस्तक्षेपातून वर्गीकरण करताना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता राहात नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here